शिराळा तालुक्यातील महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने सेविकांनी शासनाने दिलेले सदोष,निकृष्ट दर्जाचे मोबाईल बालविकास प्रकल्प अधिकारी सतीश नवले यांच्याकडे परत करताना -तालुका अध्यक्षा सौ.अलका विभूते,उपाध्यक्ष सौ.सरला घोडे-पाटील,हसीना नायकवड़ी,कमल पाटील, बीट प्रमुख पुष्पा पाटील, शारदा माने, कांता खोत
शिराळा,ता.२६: शासनाने अंगणवाडी सेविकांना दिलेले मोबाईल निकृष्ट व सदोष असल्याने हे मोबाईल बालविकास प्रकल्प अधिकारी सतीश नवले यांना अंगणवाडी संघटनेच्यावतीने परत केले.आपल्या विविध मागण्यांसाठी कार्यालया समोर आंदोलन केले. यावेळी संघटनेच्या तालुकाध्यक्ष सौ.अलका विभूते म्हणाल्या,
शासनाने अंगणवाडीत काम करणेसाठी पोषण ट्रॅकर हे दिलेले अँप इंग्रजीत आहे. त्यामुळे कमी शिक्षित असणाऱ्या अंगणवाडी सेविकांना ते वापरता येत नाही.त्यासाठी अँप मराठीत असावे. चांगल्या दर्जाचंद मोबाईल द्यावेत. पोषण ट्रॅकर अँप मध्ये असणाऱ्या त्रुटी दूर कराव्यात.
मोबाईल दर्जा चांगला नसल्याने त्याच्या दुरुस्तीचा खर्च हा सेविकांच्या मानधना पेक्षा जास्त होत असल्याने सेविकांना जीव टांगणीला लागला आहे. त्यामुळे हे मोबाईल आम्ही जमा करत आहे.
यावेळी संघटनेच्या उपाध्यक्ष सौ.सरला घोडे-पाटील, सचिव हसीना नायकवड़ी,कमल पाटील, बीट प्रमुख पुष्पा पाटील, शारदा माने, कांता खोत अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.
0 Comments