BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

म्हणून आरोग्य कर्मचारी बसले मुख्याधिकारी यांच्या खुर्चीवर




शिराळा नगरपंचायतीचे आरोग्य कर्मचारी अरूण बापू लोंढे हे सेवानिवृत्त झाले.  त्यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम  नगरपंचायत कार्यालयात संपन्न झाला. करण्यात आला होता. यावेळी नगराध्यक्षा सौ. सुनिता निकम,उपनगराध्यक्ष विजय दळवी यांच्या हस्ते अरूण बापू लोंढे व त्यांच्या पत्नी उषा  लोंढे यांना आहेर व भेटवस्तू देणेत आली. मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी भविष्य निर्वाह निधीचा धनादेश देऊन अरुण बापू लोंढे यांना आपल्या खुर्चीवर बसवून  अनोख्या पध्दतीने त्यांचा सन्मान केल्याने  लोंढे दाम्पत्य भावूक झाले. उपनगराध्यक्ष  विजय दळवी यांनी वैयक्तिक सत्कार करुन ठराविक रक्कम भेट म्हणून दिली. 
कार्यक्रमावेळी नगराध्यक्षा सुनिता निकम ,मुख्याधिकारी योगेश पाटील,  नगरपंचायत कर्मचारी सुभाष इंगवले, लक्ष्मण मलमे , तात्यासो कांबळे यांनी त्यांच्या कार्यकाळामधील अनुभव सांगितले सदरच्या आठवणी सांगताना त्यांना अश्रु अनावर झाले. 

यावेळी पाणीपुरवठा सभापती मोहन जिरंगे, नगरपंचायत अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता. अधिक्षक सुविधा पाटील यांनी आभार मानले .



Post a Comment

0 Comments