BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

नागपंचमी दिवशी शिराळा रहाणार बंद

 

शिराळा, ता.६: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व न्यायालयाच्या आदेश नुसार कायद्याचे उल्लंघन न करता शांततेत नागपंचमी साजरी करावी असे आवाहन प्रांताधिकारी ओंकार देशमुख यांनी केले.

येथील तहसीलदार कार्यालयात नागपंचमी संदर्भात आयोजित बैठकीत बोलत होते.यावेळी नगराध्यक्षा सौ.सुनीता निकम, तहसीलदार गणेश शिंदे, सहायक वनसंरक्षण विजय गोसावी,उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे, मुख्याधिकारी योगेश पाटील,पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार, सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानदेव वाघ,वनक्षेत्रपाल सुशांत काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी देशमुख म्हणाले,गतवर्षी ज्या प्रमाणे शांततेत नागपंचमी साजरी करून सहकार्य केले त्याच प्रमाणे या वर्षी शांततेत हा सण साजरा करावा.

यावेळी नागपंचमी दिवशी शिराळा येथील दुकाने बंद ठेवणे, बाहेरील लोकांना गावात न प्रवेश देणे, पालखीचा एकेरी मार्ग, पालखी पुढे कोणतेही वाद्य न वाजवणे, पंधरा सी.सी.टीव्ही कॅमेरे बसवणे, नागपंचमीच्या आदल्या दिवशी १२ तारखेला शिराळा शहरात बाहेरून येणाऱ्या सर्व मार्गावर बॅरिकेट लावणे, ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांवर कडक कारवाई करणे,शिराळा तालुका अंतर्गत व जवळील तालुक्यात जाणारी एस.टी. वाहतूक बंद ठेवणे. अंबामाता मंदिरातील पूजा व पालखी मिरवणुक साठी २५ लोकांना परवानगी देणे याबाबत चर्चा झाली.

नगरपंचायत अधीक्षक सुविधा पाटील ,  सभापती प्रतिभा पवार , सेवानिवृत्त वनक्षेत्रपाल तानाजीराव मुळीक, वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिरुद्ध काकडे,सम्राट शिंदे ,प्रणव महजन उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments