BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सातारचा बी द चेंज ग्रुप देववाडीच्या मदतीला

 


मांगले  : सातारा येथील महाविद्यालयीन तरुणांनी सामाजिक बांधिलकी जपत देव वाडी येथील शंभर घरात संसार उपयोगी वस्तूंचे वाटप केले. वारणा नदीला आलेल्या महापुरामुळे संपूर्ण देव वाडी गावात पाणी शिरले होते. बी द चेंज ग्रुप हा सातारा येथील महाविद्यालयातील तरुणांनी एकत्र येऊन स्थापन केलेला ग्रुप आहे. सार्वजनिक स्वच्छता,रक्तदान शिबिर,मोफत नेत्र तपासणी ,गड स्वच्छता यासारखे उपक्रम राबवले जातात.

     यावेळी ग्रुपचे प्रथमेश पोळ,पूजा पोळ,आर्यन कासार,सोहम सानस,अभय सानस,यशराज थोरात,ओम थोरात,आकाश गुळवे,ओंकार पाटील, शार्दूल शिंदे,संतोष टोणपे ,गजानन नाडे यांनी घरोघरी जाऊन किटचे वाटप केले.

Post a Comment

0 Comments