शिराळा, ता.११: नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर १२ ऑगस्ट राजी सायंकाळी पाच वाजल्या पासून ते १४ ऑगस्टच्या सकाळी आठ वाजे पर्यंत बाहेरील नागरिकांना शिराळा येथे येण्यास बंदी घातली आहे.न्यायालयाच्या आदेशानुसार २०२० मध्ये ज्या प्रमाणे नागपंची साजरी करण्यात आली त्याच प्रमाणे या वर्षी नागपंचमी साजरी करून प्राशासनाल सहकार्य करावे असे आवाहन प्रांताधिकारी ओंकार देशमुख यांनी केले.
शिराळा येथे नागपंचमीच्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार बैठकीत बोलत होते.यावेळी तहसीलदार गणेश शिंदे,नायब तहसीलदार अरुण कोकाटे, ए.डी.महजन, पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार, मुख्याधिकारी योगेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी देशमुख म्हणाले, नाग पकडे व त्याची पूजा करणे यावर निर्बध घालण्यात आले आहेत. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी लॉक डाऊन जाहीर करून काही निर्बंध घेतले आहेत. मंदिर परिसरात धार्मिक विधी लॉक डावूनच्या नियमाचे पालन करून होईल. त्यासाठी पाच व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे.पालखी साठी दहा व्यक्तींना पास देण्यात आला आहे. अंबामाता मंदिर नागरिकांच्यासाठी मंदिर बंद राहील. धार्मिक विधीसाठी ध्वनीक्षपक व वाद्यास बंदी घालण्यात आली आहे. शिराळा येथील नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरु नये. पालखी सोहळ्यात अडथळा निर्माण करू नये. दूध,दवाखाने, औषध दुकाने वगळता सर्व सेवा १३ ऑगस्टला बंद राहतील. सादर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. ६५ नाग मंडळाच्या १४९ अध्यक्ष व कार्यकर्त्यांना कायदा व सुव्यवस्था याचे पालन करण्यासंदर्भात नोटीस देण्यात आल्या आहेत. पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार म्हणाले,११पोलीस अधिकारी,१७५ पोलीस कर्मचारी,२० वाहतूक पोलीस,१९महिला पोलीस कर्मचारी, पाच व्हिडीओ कॅमेरे,दोन ध्वनी मापक यंत्र,दोन दंगल नियंत्रक पथक असा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.शिराळा शहरातील प्रमुख मार्ग व पालखी मार्ग येथे कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.गुन्हे दाखल असणाऱ्या शहरातील दहा जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.
0 Comments