BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

नाबार्डने ,' अॅग्री इन्फ्रास्ट्रक्चर फण्ड' योजना

 


शिराळा: कृषि क्षेत्रातील पायाभूत सुविधा गाव पातळीवरती निर्माण करून, या क्षेत्राला चालना देणेसाठी नाबार्डने ,' अॅग्री इन्फ्रास्ट्रक्चर फण्ड' योजना सुरू केली आहे.ही योजना विकास संस्थांसाठी   फायदेशीर असून,  फक्त १%  व्याज दराने दोन  कोटी रुपये पर्यंत कर्ज मिळणार आहे. त्याचा  सक्षम विकास सोसायट्यांनी लाभ घ्यावा. असे आवाहन नाबार्ड चे सहायक महाव्यवस्थापक एल्. पी. धानोरकर  यांनी केले.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शिराळा शाखेत विकास सोसायट्यांसाठी आयोजित कार्यशाळेत  ते बोलत होते. ते पुढे म्हणाले,   या योजनेंतर्गत  विकास संस्थांना 'मल्टी सर्विस सेंटर'  म्हणून विविध उपक्रम राबविण्यासाठी  कर्ज पुरवठा केला जाणार आहे .या योजनेअंतर्गत  विकास संस्थांना नाबार्डमार्फत  प्रकल्प खर्चाचे ९ ० % किंवा कमाल  दोन   कोटींच्या मर्यादेपर्यंत मुदती कर्जपुरवठा केला जाणार आहे . सदरचा कर्ज पुरवठा हा फक्त ४ % व्याज दराने ७ वर्षे मुदतीसाठी केला जाणार आहे. नियमित परतफेड करणाऱ्या संस्थांना ३ % व्याज परतावा केंद्र शासनाकडून प्रोत्साहन म्हणून दिला जाणार आहे . त्यामुळे अंतिमत : सदरचा कर्ज पुरवठा विकास संस्थांना १ % व्याज दराने उपलब्ध होणार आहे .  शेतक-यांना  पीक काढणी पश्चात व कृषि विषयक मूलभूत गरजा एकाच छताखाली उपलब्ध करुन देणे हा या योजनेचा मूळ उद्देश आहे.

या कार्यशाळेसाठी शिराळा तालुक्यातील आर्थिक दृष्ट्या सक्षम  आणि  नफ्यातील विकास सोसायट्यांना निमंत्रित करण्यात आले. होत्या. यामध्ये सागाव,बिऊर,नाटोली,मांगले,शिराळा,पणुंब्रे वारूण, पाडळी या विकास सोसायट्यांचा समावेश आहे. यावेळी बॅकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  जयवंत कडू पाटील, व्यवस्थापक सुधीर काटे,तालुका विभागीय अधिकारी अशोक माने, साजीद मुलाणी,भगवान उरुणकर आणिशिराळा तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन व सचिव उपस्थितीत होते

Post a Comment

0 Comments