BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

फेसबुक,युट्युब च्या माध्यमातून लोकांना गणेश दर्शन सोय करा-तहसीलदार गणेश शिंदे

👉 

शिराळा येथे गणेशोत्सवा निमित्त आयोजित बैठकीत बोलताना तहसीलदार गणेश शिंदे सोबत मुख्याधिकारी योगेश पाटील,पोलिस निरीक्षक सुरेश चिल्लवार, सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानदेव वाघ 

शिराळा, ता.३०: तालुक्यातील सर्व गावात एक  गाव एक गणपती ही संकल्पना राबवून या पुढील सणावर येणारे निर्बध टाळा. लोकांची गर्दी टाळण्यासाठी फेसबुक,युट्युब लाईव्ह करून लोकांना गणेश दर्शन द्या. नगरपंचायत,ग्रामपंचायत व पोलीस ठाणे यांच्याकडे नोंदणी असणाऱ्या मंडळांना गणपती बसवता येईल. असे प्रतिपादन तहसीलदार गणेश शिंदे यांनी केले.

येथील साई संस्कृती कार्यालयात आयोजित गणेशोत्सव मंडळाच्या बैठकीत बोलत होते.यावेळी शिंदे म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने सर्वाना खबरदारी घ्यावी लागणार आहे.गणपती आगमन व विसर्जन मिरवणूक काढता येणार नाही.त्यामुळे वाद्य ही वाजवता येणार नाही. सार्वजनिक गणेश मंडळांची मूर्तींची उंची चार व  घरगुती दोन फूट असावी.मंडळाने कार्यक्रम करताना कोरोनाचे नियम पाळून करावे.परिसर स्वच्छता महत्वाची आहे. मास्क व सॅनिटाईझर पाहिजे. मंडळ नोंदणीसाठी नगरपंचायत, ग्रामपंचायत व पोलिसांनी स्वतंत्र कक्ष उभारावा. ध्वनी प्रदूषण कायद्याची कडक अंमलबजावणी करावी. उत्सवाला बाधा येईल असे कोणतेही कृत्य करू नये.

मुख्याधिकारी योगेश पाटील म्हणाले,मंडळांनी मनोरंजना पेक्षा कोरोनाच्या व इतर साथीच्या आजाराबाबत भित्तीपत्रकांच्या माध्यमातून जनजागृती करावी. घरीच आरती करून मूर्ती विसर्जन करावी.

पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार म्हणाले, गणेश मूर्ती आणण्यासाठी कोणी ही गर्दी करू नये.विक्रेत्यांनी योग्य नियोजन करावे.एकाच वेळी गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी.

यावेळी मुख्याधिकारी योगेश पाटील,पोलिस निरीक्षक सुरेश चिल्लवार, सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानदेव वाघ , मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष उपस्थित होते.

अधिकारी म्हणतात......

👉गणपती आगमन व विसर्जन मिरवणूक काढता येणार नाही.

👉 सत्यनारायणाच्या पुजेला व धार्मीक विधीला परवानगी पण महाप्रसादाला नाही.

👉प्रसाद द्यायचाच असेल तर घरपोच द्या.

👉एक  गाव एक गणपती ही संकल्पना राबवून या पुढील सणावर येणारे निर्बध टाळा.

 👉गर्दी टाळण्यासाठी फेसबुक,युट्युब लाईव्ह करून लोकांना गणेश दर्शन द्या.

👉नगरपंचायत,ग्रामपंचायत व पोलीस ठाणे यांच्याकडे नोंदणी असणाऱ्या मंडळांना गणपती बसवता येईल.

👉कार्यक्रम करताना कोरोनाचे नियम पाळून करावे.

👉 सार्वजनिक गणेश मंडळांची मूर्तींची उंची चार व  घरगुती दोन फूट 

👉परिसर स्वच्छता, मास्क व सॅनिटाईझर पाहिजे.

👉मनोरंजना पेक्षा कोरोनाच्या व इतर साथीच्या आजाराबाबत भित्तीपत्रकांच्या माध्यमातून जनजागृती करा

👉 घरीच आरती करून मूर्ती विसर्जन करा

👉 गणेश मूर्ती आणण्यासाठी कोणी ही गर्दी करू नये.

👉विक्रेत्यांनी योग्य नियोजन करावे.एकाच वेळी गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी.



Post a Comment

0 Comments