BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

दीपावली पूर्वी २२५ रुपये अंतिम बील देऊन दीपावली गोड करू-आमदार मानसिंगराव नाईक

 


शिराळा (प्रतिनिधी) ः केंद्र सरकारने आत्ता जशी प्रतिटन ऊसाची अधारभूत किंमत वाढवली आहे, तशी साखरेचीही प्रति व्किंटलला ५०० रुपयांनी वाढ करावी, अशी मागणी अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी केली. 

विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखाना दिपावलीपूर्वी उर्वरीत सर्व प्रतिटन २२५ रुपयांचे अंतिम बिल देवून ऊस उत्पादकांची दिपावली गोड करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

चिखली (ता. शिराळा) येथे आज ‘विश्वास’ कारखान्याच्या गळीत हंगाम २०२१-२२ साठी बॉयलर अग्निप्रदीप समारंभ संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते. उपाध्यक्ष, माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरूडकर, सौ. सुनितादेवी नाईक व सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक प्रमुख उपस्थित होते.

आमदार नाईक म्हणाले, गेल्या कांही वर्षापासून साखर कारखानदारी अडचणीतून वाटचाल करीत आहे. ऊसाची आधारभूत किंमत, तोडणी, वाहतूक, उत्पादन, बँकांकडील कर्जावरील व्याज आदी खर्च आणी बाजारातील साखरेला मिळणारा दर याचा मेळच बसत नाही. त्यात जुलै २०२१ आलेल्या महापूराचे आस्मानी संकटामुळे साखर उद्योगाला अडीचणींना सामोरे जावे लागणार आहे. या गोष्टींचा विचार करून केंद्र सरकारने जशी प्रतिटन ऊसाची अधारभूत किंमत वाढवली आहे, तशी साखरेचीही प्रति व्किंटल ५०० रुपयांनी वाढवून साखर व्यवसायाला मदतीचा हात द्यावा, अशी मागणी केली. 

ते म्हणाले, गेल्या वर्षीच्या गळीत हंगामात ५ लाख ८० हजार ८४३.५२० मेट्रीक टन ऊसाचे गाळप केले. ६ लाख ६२ हजार ६१० क्विंटल साखर पोती उत्पादन झाले. प्रतिटन २ हजार ९७५ रुपये ०९ पैसे या हमी भावाप्रमाणे पहिली उचल २ हजार ५००, दुसरा हप्ता २५० रुपये प्रमाणे अदा केला आहे. आता राहिलेली रक्कम २२५ रुपये प्रतिटन प्रमाणे दिपावलीत एकरकमी देवून ऊस उत्पादकांनी दिपावली गोड करणार आहे. 

प्रारंभ मुख्य अभियंता दिपक पाटील यांनी स्वागत केले. सौ. निर्मला व संचालक श्री. बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते विधीवत पुजन व बॉयलर अग्निप्रदीपन संपन्न झाले. यावेळी ‘प्रचिती’ संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रसिंह नाईक, विवेक नाईक, संचालक सर्वश्री.  दिनकरराव पाटील, शिवाजीराव घोडे-पाटील, विजयराव नलवडे, भीमराव गायकवाड, विश्वास कदम, मानसिंग पाटील, सुरेश पाटील, विष्णू पाटील, शिवाजी पाटील, तानाजी वनारे, विश्वास पाटील, डॉ. राजाराम पाटील, संभाजी पाटील, बिरुदेव आमरे, बाबुराव नांगरे, हंबीरराव पाटील, दत्तात्रय राणे, शामराव मोहिते, यशवंत दळवी, शंकर नांगरे, कामगार संचालक दत्तात्रय पाटील, कार्यकारी संचालक राम पाटील, सचिव सचिन पाटील, यु. जे. पाटील, कामगार संघटनेचे उपाध्यक्ष विजय पाटील तसेच सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख, सभासद, कर्मचारी आदी उपस्थित होते. खरेदी अधिकारी राजेंद्र पाटील यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments