BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

पत्रकार शिवाजी कुंभार


 श्री.शिवाजी धोंडीबा कुंभार.

मु.पो.सोनवडे.ता.शिराळा.जि.सांगली.

जन्म तारीख—१९/४/१९७६.

मो—९७३०७८३४७८.

इमेल—shivajikumbhar64@gmail.com

अनुभव - दै.पुढारी (सांगली) शिराळा - शेडगेवाडी वार्ताहर म्हणून 14 वर्ष काम केले आहे.SBN मराठी न्युज चॅनेलला शिराळा तालुका प्रतिनीधी म्हणून पाच वर्ष काम केले आहे.  

 —शिक्षण— पहीली ते चौथी जि.प.शाळा सोनवडे.पाचवी ते दहावी हुतात्मा नानकसिंग विध्यालय सोनवडे.तर आकरावी ते बारावी छञपती विद्यालय  शिराळा येथे झाले. सन 2001 सालापासुन ते 2015 पर्यंत दै.पुढारीला चौदा वर्ष शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी वार्ताहर म्हणुन काम केले आहे.शिराळा तालुका महाराष्ट्र पञकार संघाचे उपाध्यक्ष पद दोन वर्ष भुसविले आहे. 

शिराळा तालुका SBN मराठी न्युज चॅनेल प्रतिनिधी म्हणुन 2015 सालापासून काम करत होतो.त्या दरम्यान शिराळा,शाहुवाडी  तालुक्यातील धार्मीक,सामाजीक,राजकीय,शैक्षणीक,पर्यटन सुविधा अशा वेगवेगळया क्षेञातील बातम्या प्रसिदध करुन ग्रामीण भागातील लोकांची मने जिंकण्याचे काम केले आहे.SBN मराठी न्युज चॅनेलच्या माध्यमातुन गेल्या पाच वर्षापासुन तालुक्यातील वेगवेगळया विषयावर स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातुन प्रकाश झोत टाकुन लोकांना न्याय मिळवुन देण्याचे काम केले आहे.

 चॕनेलच्या माध्यमातुन केलेल्या कामाची दखल घेऊन शिराळा तालुक्यातील पाचगणी येथील संघर्ष युवा प्रतिष्ठाणचा राज्यस्तरीय आदर्श शिवरत्न पञकार पुरस्कार 4 मार्च 2018 रोजी शिवजयंती दिवशी देऊन मला सन्मानित करण्यात आले आहे.

 5 जानेवारी 2019 रोजी शिराळा येथील न्यु इंग्लीश स्कुलमध्ये महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशनच्यावतीने नवरत्न दर्पन आदर्श इलेक्ट्रॉनिक्स मिडीया पञकार भुषण पुरस्कार कोल्हापूर परीक्षेञाचे विशेष पोलिस महानिरीक्षक मा.विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

 कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदन येथे स्प्राइट आॕफ स्पंदनचा राज्यस्तरीय आदर्श मिडीया पञकार पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले आहे.यावेळी पुरस्काराला लावणीसंम्रागणी विजया पालव,झी मराठी वाहीनीवरील स्वराज्य रक्षक संभाजी या मालीकेतील राणुअक्का फेम आश्वीनी महांगडे,लागीर झालं जी फेम लक्ष्मी विभुते,कराड गुन्हे अन्वेशन शाखेचे प्रमुख स्वप्निल लोखंडे,कराड सहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रकांत माळी,लिम्का बुक आॕफ होल्डर डाॕ.राजेंद्र कंटक आदी मान्यवरांच्या उपस्थीतीत सन्मान सोहळा संपन्न झाला.

 पणजी गोवा येथे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते आदर्श मिडीया पञकार पुरस्कार 27 मे 2019 रोजी देऊन सन्मानीत करण्यात आले आहे.कार्याची दखल घेऊन इचलकरंजी येथे स्टार वसुंधरा आदर्श पञकार पुरस्कार 14 जुलै 2019 रोजी निवृत्त वायुसेना अधिकारी (भारत सरकार) आर.बी.पाटील,लोणावळा नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष डाॕ.धिरजलाल टेलर,भारतीय युवा शास्त्रज्ञ धनेश बोरा,अध्यक्ष विजय तोडकर यांच्या हस्ते देऊन सन्मानीत करण्यात आले आहे.

 पुणे येथील आण्णा भाऊ साठे नाटयगृहात 18 सप्टेंबर 2019 रोजी तृप्ती देसाई यांच्या हस्ते या वर्षीचा भास्कर भूषण स्टार आयकाॕन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

  2021 चा अखिल महाराष्ट्र पञकार व पञलेखक संघाचा राज्यस्तरीय कोविड योध्दा समाजरक्षक महासन्मान पुरस्कार कोरोना संकट काळात आॕनलाईन 25 मे रोजी देऊन गौरविण्यात आले आहे.

 गेल्या एक वर्षापासुन शेतकरी मराठी न्युज चॕनेलला उपसंपादक म्हणुन काम पहात आहे.तर शिराळा तालुका विशेष प्रतिनिधी म्हणुन परीसरातील घडामोडीच्या बातम्या शेतकरी मराठी न्युजच्या माध्यमातून प्रसारीत करीत आहे.

Post a Comment

0 Comments