BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

पत्रकार दिनेश हसबनीस

 


दिनेश दामोदर हसबनीस

जन्म - १५-५-१९६५

रक्तगट - AB+

शिक्षण - बी. ए. मराठी (स्पेशल) व वृत्त पत्र पदवी. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ.

१९८४ ते १९९४ दैनिक सकाळ साठी शिराळा तालुका प्रतिनिधी

१९९४ पासून आज अखेर दैनिक केसरी साठी तालुका प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे. १९९४ पासून दहा वर्षे लोकसत्ता साठी प्रतिनिधी म्हणून शिराळा येथे काम केले.

२००५ त २००७ शिराळा ग्रामपंचायत सदस्य व स्थायी समिती चा अध्यक्ष म्हणून काम केले.

शंभरी कडे वाटचाल करणाऱ्या तरूण मित्र मंडळ वाचनालयाची उपाध्यक्ष म्हणून सध्या जबाबदारी आहे. गेली १५ वर्षे संचालक म्हणून काम करीत आहे.

राज्य, जिल्हा व तालुका पातळीवर अनेक पुरस्कारांनी गौरवलेली श्री दत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित इस्लामपूर चा संस्थापक संचालक. माजी व्हाईस चेअरमन व शिराळा शाखा प्रमुख म्हणून काम केले. सध्या प्रधान शाखेचे शाखा प्रमुख म्हणून जबाबदारी आहे.

महाराष्ट्र शासनाचा अधिस्वीकृती धारक पत्रकार आहे.

विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून १० वर्षे.

शिराळा तालुका समन्वय समितीचा अशासकीय सदस्य म्हणून १० वर्षे यशस्वी काम.

सांगली आकाशवाणी साठी सलग १० वर्षे तालुका विकास पत्र सादर केले.

२०१६-१७ रोजी आदर्श संचालक म्हणून गौरव

२०१९ स्टार आयकॉन अवॉर्ड आदर्श पत्रकार पुरस्कार

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने " कोविड योद्धा सन्मानपत्र "

२०२० रोजी महाराष्ट्र journalist फौंडेशनच्या वतीने आदर्श पत्रकार म्हणून गौरव यांच्या वतीने पुन्हा २०२१ वर्षी गौरवभास्कर भुषण अवॉर्ड सामाजिक कामासाठी नवरत्न दर्पण पुरस्कार २०१९ प्राप्त

स्वातंत्र सैनिक यशवंतराव निकम यांचे स्मरणार्थ सन्मान चिन्ह

सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने २००३ रोजी उत्कृष्ट ग्रामीण पत्रकार म्हणून पुरस्कार

सद्गुरु जंगली महाराज शिक्षण संस्था यांचे वतीने २०१९-२० रोजी उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार

२०२० रोजी अलिबाग येथे आदर्श पत्रकार व सामाजिक कामासाठी गौरव महाराष्ट्र फौंडेशन तर्फे

२०१५ चा आदर्श तालुका प्रतिनिधी म्हणून केसरी कडून गौरव

महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघ यांच्या वतीने विशेष सन्मानपत्र २०२१

वारणा महाविद्यालय, ऐतवडे खुर्द यांच्या वृत्तपत्र विद्या व संवाद शास्त्र विभागाचे वतीने २०२१ रोजी *साहित्यप्राज्ञ बाजीराव बाळाजी सर्वोत्कृष्ट पत्रकारीता पुरस्कार* देण्यात आला.

शिराळा येथील श्री दत्त सेवा मंडळाची अध्यक्ष म्हणून गेली २५ वर्षे जबाबदारी. ग्रामीण पत्रकार संघटनेचा संस्थापक अध्यक्ष म्हणून १५ वर्षे काम केले.शिराळा तालुका मानवाधिकार संघटनेचा कार्याध्यक्ष म्हणून व प्रेस क्लब ऑफ शिराळा चा कार्याध्यक्ष म्हणून काम करीत आहे.

या शिवाय सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर सहभागी असतो.

Post a Comment

0 Comments