BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

चक्रीवादळ व महापुरात अखंडपणे विद्युत सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान

 


शिराळा:15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त ग्रामपंचायत नाटोलीच्यावतीने वीज कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला 2021 चे चक्रीवादळ व महापूर या मोठ्या संकटामध्ये काम करून गावाच्या सेवेसाठी अखंडित वीज पुरवठा दिल्याबद्दल हा विशेष सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी सत्कार मूर्ती अमर सपाटे, राहुल पाटील, संदीप मुळीक ,संभाजी घोलप ,जयवंत कांबळे, अक्षय खोत ,श्रीकांत साळुंखे ,निवास खोत हे उपस्थित होते.

 यावेळी अजित पाटील यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमासाठी उपसरपंच काशिनाथ पाटील, बाबुराव चव्हाण, ग्रामसेवक खैर ,क्लार्क सागर पाटील ,मुरारी पाटील,  केंद्रशाळा नाटोली चे मुख्याध्यापक सर्व शिक्षक स्टाफ सर्व ग्रामपंचायत सदस्य व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments