शिराळा तालुका हा अतिपावसाचा तालुका म्हणून ओळखला जातो.गत आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे या वाडीतील अनेक घरात अंतर्गत पाण्याचे उमाळे प्रवाहित होऊन घरातूनच पाण्याचे पाट काढून पाणी बाहेर काढण्यात आले.अद्याप त्या घरात पाण्यामुळे ओलं आली असल्याने चूल पेटवता येत नाही. जमिनीवर झोपता येत नाही.एका कॉट अथवा पलंगावर जास्ती जास्त तीन माणसं झोपू शकतात.मात्र घरात तीन पेक्षा जास्त लोकं असतील उर्वरीताना अर्धी रात्र जागून काढावी लागते. त्यानंतर झोपले उठून जागे असणारे झोपतात.तर ज्यांच्या घरी ओलं नाही त्यांच्या घरी झोपण्यासाठी जावे लागते. जनावरे गोठ्यात असणाऱ्या ओलीतच बांधावी लागतात.
ही वाडी डोंगरावर व डोंगर पायथ्याशी आहे. मातीची घरे असल्याने डोंगरात मुरणारे व पावसाचे पाणी यामुळे घरात अंतर्गत उमाळे प्रवाहित होऊ घर हे गटात बनू लागले आहे. घरात उमाळे प्रवाहित होऊ लागल्याने ते पाणी घरातच चर मारून बाहेर काढावे लागत आहे. चूल पेटवत येत नाही.धान्यांची टोपली ही भिजून जात आहेत.मातीची घरे असल्याने घरात पाणी मुरून ती घरे ही कमकुवत बनत आहेत.अशा घरात रहाणे हे ही धोकादायक आहे.त्यामुळे या ठिकाणी घरात पाण्याचे उमाळे प्रवाहित होऊ नयेत यासाठी योग्य ती उपाय योजना करणे गरजेचे आहे.या पावसानं आमचं जगणं हैराण केलं आहे.
बाहेर वारा आणि पाऊस अन् घरात पाणी यामुळे आमचं जगणं हैराण झालं आहे.घरातच झऱ्या सारखे पाणी वाहू लागल्याने आमच्या चुली पेटत नाहीत.घरात धान्य असून काहीवेळा अन्न शिजत नाही.झोपण्यासाठी कॉट चा आधार घ्यावा लागतोय. पण एका कॉट वर किती माणसं झोपणार अशी खंत ८० वर्षीय भिवाजी उजगावकर यांनी व्यक्त केली.
0 Comments