BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे साधन- माजी सभापती अॅड भगतसिंग नाईक

 


शिराळा:समाज परिवर्तनाचे साधन शिक्षण आहे . त्यामुळे समाजाच्या उन्नतीसाठी दर्जेदार शिक्षण  गरज असल्याचे प्रतिपादन शिराळा पंचायत समितीचे माजी सभापती अॅड भगतसिंग नाईक यांनी केले.

शिवछत्रपती विद्यालय व स्व. वसंतराव नाईक ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स मध्ये भीमराव पवार यांच्या सेवा निवृत्ती कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलताना केले.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे  बी. डी. कांबळे होते.या वेळी प्रमुख उपस्थिती संस्थेचे सचिव विश्वप्रतापसिंग नाईक, संचालक पृथ्वीसिंग नाईक, मुख्याध्यापक विठ्ठल नलवडे , महादेव कदम,जे. पी. बाऊचकर होते. 

या वेळी स्वागत व प्रास्ताविक अशोक कुभांर यांनी केले.या वेळी व्ही. बी. पाटील, एस. एम. पाटील, सोपान जाधवर, संजय पाटील यांनी  मनोगत व्यक्त केले .

विद्यालयातील प्रणया सुतार हीने एन. एम. एम. एस. परिक्षेत प्राविण्य मिळवले बद्दल आणि दहावी व बारावीच्या परीक्षेत प्रथम पाच आलेल्या विद्यार्थ्यांना अॅड भगतसिंग नाईक, बी. डी. कांबळे यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. 

या वेळी भीमराव पवार यांच्या सेवा निवृत्ती निमित्त त्यांचा  सपत्नीक सत्कार करण्यात आला. 

या वेळी भीमराव पवार म्हणाले, संस्थेत मला सेवा करण्याची संधी मिळाली त्या मुळे माझ्या जीवनाचा कायापालट झाला. 

या वेळी संस्थेचे संचालक शरद नलवडे, तानाजी हवालदार, देविदास पोवेकर मुख्याध्यापक आर.वाय. नलवडे, तानाजी यादव, वाय.पी. बेंद्रे, श्रीमती व्ही. जी. कांबळे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी  उपस्थित होते. आभार बी. आर.पाटील यांनी मानले.

Post a Comment

0 Comments