BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

डी. आर. जाधव यांच्या राष्ट्रपती पदकामुळे गाव व तालुक्याचे नाव देशपातळीवर


 कोकरूड ः राष्ट्रपती पदक विजेते पी. एस. आय.
 डी. आर. जाधव यांच्या माध्यमातून गावाचे, तालुक्याचे नाव देशपातळीवर झळकले आहे, असे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले. 

चिंचोली (ता. शिराळा) येथे ग्रामस्थांच्या वतीने उल्लेखनिय कामगिरीबद्दल राष्ट्रपती पदक विजेते अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे उपाध्यक्ष डी. आर. जाधव यांचा नागरी सत्कार समारंभात बोलत होते. तालुक्याचे उपसभापती बाळासाहेब नायकवडी प्रमुख उपस्थितीत होते.

आमदार नाईक म्हणाले, आतापर्यंत सर्वच क्षेत्रात डोंगराळ व दुर्गम शिराळा तालुक्यातील गुणवंतानी नेत्रदिपक कामगिरी केली आहे. वेळोवेळी ते सिद्ध झाले आहे. केंद्रीय व राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षेतून अनेक सनदी अधिकारी देशाला व राज्याला दिले आहेत. मल्ल विद्येतून चिंचोली गावचे संपतराव जाधव यांनी उप महाराष्ट्र केसरी किताब पटकावून गावचे, तालुक्याचे नाव महाराष्ट्रात केले होते. त्यापुढे जाऊन डी. आर. पाटील यांनी राष्ट्रपती पदक पटकावून देशपातळीवर नाव कमावले आहेत. याचा आम्हाला अभिमान आहे. 

प्रारंभी सरपंच फत्तेसिंग पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. आमदार मानसिंगभाऊंच्या हस्ते राष्ट्रपती पदक विजेते अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे उपाध्यक्ष डी. आर. जाधव यांचा नागरी सत्कार झाला. डॉ. नंदकुमार पाटील, उप महाराष्ट्र केसरी पै. संपतराव जाधव, उपसरपंच सुरेश जाधव, माजी सरपंच अमर जाधव व तानाजी जाधव, नामदेव पाटील, माजी सरपंच शरद जाधव, नारायण जाधव व दाजी सकटे, मोरेवाडीचे सरपंच अशोक डिगे, राहुल जाधव, केशव जाधव,शिवाजी जाधव, ज्ञानदेव जाधव, पोलीस पाटील भरत चव्हाण  उपस्थित होते. प्रकाश जाधव यांनी आभार मानले.


Post a Comment

0 Comments