ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ.सुनीलकुमार लवटे यांच्या पुढाकाराने उपक्रम.
मोबाईलअभावी ज्यांचे शिक्षण थांबले आहे, अशा जिल्हयातील 34 विदयार्थ्यांना क्रिएटिव्ह टिचर्स फोरमच्या वतीने मोफत स्मार्टफोन, सिम कार्ड, आणि पाचशे रुपयांचा रिचार्ज देण्यात आला. गोरगरीब पालकांना स्मार्ट मोबाईल घेणे परवडत नसल्याने मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ.सुनीलकुमार लवटे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला.
कोरोनामुळे अनेक पालकांचे रोजगार गेले आहेत. अनेक कुटुंबे द्रारिद्रयच्या गर्तेत कोसळून पडलेली आहेत. सर्वच पालक आपल्या मुलांना स्मार्ट फोन घेऊन देऊ शकत नाहीत. अशा पालकांच्या मुलांना मुख्यत: हे मोबाईल देण्यात आले. सामाजिक परिस्थितीची जान आणि भाण असणाऱ्या समाजातील दानशुर व्यक्तीनी डॉ.सुनीलकुमार लवटे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गरजू विदयार्थ्याना एक स्मार्ट फोन देऊन सामाजिक पालकत्व स्विकारले. पन्हाळा येथील बालग्रामची मुले, सांगली अनाथाश्रमातील मुलांसह जिल्हयातील दूर्गम खेडयातील जिल्हा परिषद, मनपा तसेच माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या 34 विदयार्थ्यांना हे मोबाईल देण्यात आले.आमच्या वेंगरुळ शाळेतील संचित कृष्णा लाड या एका गरजू विद्यार्थ्यांला मोबाईल मिळाला. त्याच्या चेहऱ्यावरील झालेला आनंद व त्याच्या पालकांची प्रतिक्रिया पाहून खूप समाधान वाटले.
प्रवीण डाकरे सर
0 Comments