BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

तोरणा ओढ्यालगतच्या पुरसंरक्षण भिंतीचा आराखडा तयार करा-आमदार मानसिंगराव नाईक


 शिराळा : पावसामुळे नुकसान झालेल्या येथील तोरणा ओढ्यालगत कासार गल्ली ते दत्त मंदिर परिसरापर्यंत पूर संरक्षक भिंत बांधणे व इतर कामे करण्याबाबत पाहणी करताना आमदार मानसिंगराव नाईक, कार्यकारी अभियंता सौ. जे. ए. देवकर ,विजयराव नलवडे , विश्वास कदम, नगराध्यक्षा सौ. सुनीता निकम, उपनगराध्य विजय दळवी

शिराळा : येथील तोरणा ओढ्यालगत कासार गल्ली ते दत्त मंदिर परिसरापर्यंत पूर संरक्षक भिंत बांधणे, आवश्यक ठिकाणी दुरुस्ती करणे व गरजेच्या ठिकाणी घाट करणे  या कामाच्या नियोजनासाठी आमदार मानसिंगराव नाईक व जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सौ. जे. ए. देवकर यांनी  भेट देऊन पाहणी केली.

अतिवृष्टीमुळे  तोरणा ओढ्यास पूर येऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यावेळी  या कामाचा सुमारे पाच कोटी रुपयांपर्यंत आराखडा तयार करण्याचा निर्णय झाला. पूल गल्ली येथील पुलाची उंची वाढवण्याबाबत चर्चा झाली.

यावेळी 'विश्वास'चे संचालक विजयराव नलवडे , विश्वास कदम, नगराध्यक्षा सौ. सुनीता निकम, उपनगराध्य विजय दळवी, सभापती सौ. प्रतिभा पवार, नगरसेवक गौतम पोटे, संजय हिरवडेकर, गजानन सोनटक्के, सुनील कवठेकर, संभाजी गायकवाड, अजय जाधव, राजू निकम, बाबा कदम, वासीम मोमीन, सागर नलवडे, नतेश यादव, उप विभागीय अभियंता एल. बी. मोरे, शाखा अभियंता सी. बी. यादव, कनिष्ठ अभियंता एस. के. पाटील  उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments