शिराळा, : शिराळा तालुक्यातील वाकुर्डे बुद्रुक ते मानकरवाडी दरम्यान असणारा कालवा अंत्री खुर्द हद्दीत पावसाने फुटल्याने पिकांचे नुकसान झाले आहे.
गेल्या आठवड्यात अतिवृष्टी झाल्याने या अतिवृष्टीत अंत्री खुर्दच्या हद्दीत असणारा वाकुर्डे बुद्रुक ते मानकरवाडी कालवा पाणी सोडण्याच्या गेट जवळ फुटला. त्यामुळे त्या कालव्याच्या खाली असणाऱ्या शेतांचे व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
करमजाई तलावातून मानकरवाडी तलावात वाकुर्डे योजनेचे पाणी नेण्यासाठी वाकुर्डे ते मानकरवाडी असा कालवा काढण्यात आला आहे. या कालव्यातून दरम्यानच्या शेतीला पाणी देण्यासाठी गेट ठेवली आहेत.
यावर्षी जून महिन्यात शिराळा तालुक्यातील सर्व तलाव व मोरणा धरण पूर्ण क्षमतेने भरले. गत आठवड्यात संततधार पावसाने सुरवात केल्याने तलावातून पाण्याचा विसर्ग वाढला व पावसाचे पाणी यामुळे करमजाई तलावातून कालव्याद्वारे मानकरवाडी जाणाऱ्या पाण्याचा प्रवाह वाढला.त्या वाढत्या प्रवाहामुळे अंत्री खुर्दच्या हद्दीत गेट जवळ कालवा फुटल्याने वाकुर्डे कडून येणारे सर्व पाणी मोठ्या प्रमाणात वाहू लागल्याने या परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
कालवा फुटून जवळपास ६० ते ७० हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून त्या ठिकाणचे पंचनामे केले आहेत.
किशोर गावडे (ग्रामसेवक अंत्री खुर्द)।
0 Comments