नाटोली (ता. शिराळा) येथील आण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त बोलत होते.
यावेळी ते म्हणाले,समाजातील शैक्षणिक दर्जा उंचावल्याशिवाय समाजाची प्रगती होणार नाही. त्यामुळेच विदयार्थ्यांनी शिक्षणाकडे विशेष लक्ष द्यावे.
या कार्यक्रमास कोकरूड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक श्री हरिभाऊ साठे उपस्थित होते.
या वेळी समाजतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शैक्षणीक साहित्य देऊन करण्यात आला. श्री हरिभाऊ साठे यांची सहायक पोलीस निरीक्षकपदी नेमणूक झालेबद्दल त्यांचा सत्कार नाईक यांच्या हस्ते करण्यात आला .तसेच सामाजिक योगदाणाबद्दल व कोविड योद्धा म्हणून श्री तानाजी सातपुते सर यांचा सत्कार समाजाच्या वतीने करण्यात आला.यावेळी सहायक पोलीस निरीक्षक हरिभाऊ साठे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रममाचे सूत्रसंचालन श्री प्रकाश सातपुते सरांनी केले.यावेळी माजी उपसरपंच श्री शिवाजी सातपुते, दादासो सातपुते, तलाठी श्री मारुती सातपुते,प्रमोद सातपुते, वैभव सातपुते, सम्राट सातपुते, रोहित सातपुते, देवदत्त सातपुते, बाबासो कांबळे तसेच विद्यार्थी, महिला व जेष्ठ नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. आभार संविधान प्रतिष्ठानचे संस्थापक श्री संदीप कांबळे यांनी मानले.
0 Comments