शिराळा: चांदोली धरण परिसरात पावसाचा जोर कमी झाल्याने २४ तासात २२मी.मी.पावसाची नोंद झाली आहे. चांदोली धरणाचे दरवाजे बंद केल्याने फक्त विद्युत निर्मिती मधून ९०० कुसेक्सने विसर्ग सुरू असल्याने वारणा नदीच्या पाणी पातळीत घट झाली आहे. त्यामुळे वारणेचे पाणी पात्रात गेले असून वारणा नदीवर असणारे पूल व बंधारे मोकळे झाले आहेत.
धरणाच्या पाण्याची पातळी ६२२.३५ मीटर असून धरणात २२.८८ टी. एम.सी. म्हणजे ८३.१४ टक्के पाणीसाठा आहे. चांदोलीत २४ तासात २२ तर आठ तासात ७ एकूण २२१० मी.मी.पावसाची नोंद झाली आहे.
0 Comments