शिराळा, ता. २७: येथील के. बी. पी. निवासी रेड-शिराळा शाळेच्या सोहम सावंत , विनय पाटील , दिविजय पाटील आदी विद्यार्थीचे राष्ट्रीय आर्थिक दुर्भल शिष्यवृत्ती परिक्षेत (NMMS )परिक्षेच्या गुणवत्ता यादीत निवड झाली आहे. त्यांच्या यशाचे कौतुक सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक फत्तेसिंह पाटील यांनी केले. शिष्यवृत्ती जिल्हा गुणवत्ता यादीत सोहम सावंत ९ वा, विनय पाटील ११ वा तर दिग्विजय पायमल ४९ वा आला आहे. सर्वसाधारण यादीमध्ये फत्तेसिंह पाटील, सुरेश शेळके यांनी यश मिळविले आहे. संस्था प्रशासक स्वाती बांदल, सर्व शिक्षकांचे त्यांना सहकार्य लाभले आहे.
0 Comments