BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

२ सप्टेंबरला आनंदराव नाईक गुणवत्ता पुरस्कार वितरण

 


शिराळा,ता.२५: येत्या दोन सप्टेंबरला देशभक्त आनंदराव नाईक यांची ११९ वी जयंती साजरी होत आहे. या निमित्त देशभक्त आनंदराव नाईक गुणवता पुरस्काराचे वितरण साहित्यिक, ज्येष्ठ पत्रकार डॉ. विजय चोरमारे यांच्या हस्ते होणार आहे. ही माहिती कार्यकारी संचालक राम पाटील यांनी दिली.

ते म्हणाले, देशभक्त स्व. आनंदराव नाईक यांच्या कार्याचे सदैव स्मारण रहावे, यासाठी तात्यांच्या जयंती निमित्ताने दरवर्षी गुणवत्ता पुरस्काराचे वितरण करण्यात येते. यावर्षिही २ सप्टेंबरला हा वितरण सोहळा विश्वास कारखान्याचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली व उपाध्यक्ष, माजी आमदार बाबासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. यावेळी विश्वास शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमरसिंग नाईक, आनंदराव नाईक पत संस्थेचे अध्यक्ष, तालुक्याचे माजी सभापती सम्राटसिंग नाईक उपस्थित असतील. कार्यक्रम कारखाना स्थळावरील गणेश मंदिराशेजारील चिंतन मंडपात सकाळी ११ वाजता कोविड-१९ चे सर्व नियम पाळून संपन्न होईल. कार्यकारी संचालक श्री. पाटील म्हणाले, पुरस्कार वितरण सोहळ्यात राष्ट्रपती पदक विजेते, पी. एस. आय. डी. आर. पाटील (चिंचोली), सेंट्रल डी. वाय. एस. पी. तुषार तानाजी गावडे (मांगले), पी. एस. आय. मानसिंग रंगराव खबाले (शिराळा), पी. एच. डी. मिळविलेले गुणवंत असे : सुनिल अभिमन्यू गायकवाड व दत्तात्रय रंगराव पाटील ( दोघे शिराळा), प्रविण सुभाष पाटील (मांगले) व सागर सुभाष मोहिते (सांगाव) यांना आनंदराव विषेश गुणवता पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. दहावी शालांत परिक्षेत तालुक्यात प्राविण्य मिळविलेले पहिले तीन विद्यार्थी तसेच, बारावी परिक्षेत कला, वाणिज्य, विज्ञान शाखेत तालुक्यात प्रविण्य मिळविलेले अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकाविलेले विद्यार्थ्यांना आनंदराव नाईक गुणवता पुरस्काराने सन्मानीत करण्यात येईल. 

Post a Comment

0 Comments