शिराळा,ता.३१:कोरना नियमांचे पालन करून , लोककलावंतांना कला सादर करण्यास परवानगी देण्यात यावी. यासाठी शिराळा तालुका सांस्कृतिक कला मंचच्या वतीने तहसीलदार गणेश शिंदे यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की,आम्हा सर्व कलावंताची कौटूबिक गुजरान ही आम्ही सादर करत असलेल्या कलेवर आहे . कोरोनाकाळात आम्हास अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे . शिवाय आमच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे . अनेक कलावंताचे कुटूंबे रस्त्यावर आली आहेत. लोककला , लोकसंगीत , ऑकेस्ट्रा , बँन्ड , बँजो , ललीतकला क्लासेस , नाट्य , वाघ्यामुरळी , पोतराज , वासुदेव यासह विविध लोककलावंत यांना त्राास सहन करावा लागत आहे. इतर कोणतेही काम नसल्याने त्यांचे प्रचंड हाल होत आहेत . तरी यावर साहानुभूती पुर्वक विचार करून तालुक्यातील सांस्कृतिक कलानां कोरोनाचे नियम पाळून कला सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात यावी. आम्हा कलाकारांची उपासमारी आणि हाल थांबवावे. हे निवेदन देण्यासाठी शिराळा तालुका सांस्कृतिक कलामंचचे
वृध्द कलाकार मानधन सांगली जिल्हा समिती सदस्य अनंत सपकाळ, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ भरारी पथक समिती सदस्य अभिनेते रंगराव घागरे ,शिराळा सांस्कृतिक कलामंच अध्यक्ष विक्रम दाभाडे ,वैजनाथ चौगुले,शिवाजीराव चौगुले, उल्हास कांबळे, डॉ . शैलेश माने , सलिका पठाण , रणजीत चव्हाण , राज लोखंडे,दिलीप सुतार, पी.एस.कांबळे आदी उपस्थित होते.
0 Comments