शिराळा,ता.३०:आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या तत्वज्ञ,समाजशास्त्रज्ञ डॉ.गेल ऑम्वेट एक विद्वान कार्यकर्त्या आणि अभ्यासक होत्या. फुले-आंबेडकर-मार्क्स विचारांची जगाला नव्याने ओळख करून देणाऱ्या शोषित, वंचित, पिडितांचा एक बुलंद आवाज कायमचा शांत झाला.
अशा शब्दात शिराळा येथे संत गाडगे महाराज स्मृती भवन येथे पुरोगामी संघटना मार्फत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
कॉम्रेड गेल यांच्या निधनामुळे पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या मनात एक भावनिक पोकळी निर्माण आहे. चळवळीत अनेक वर्षे काम करत असताना त्यांच्या समवेत समाजसेवा करण्याचे भाग्य लाभले. युवा वर्गाने त्यांच्या साहित्याची संशोधन,मांडणी समजून घेणे गरजेचे आहे.
सुधीर दाभाडे म्हणाले, डॉ. गेलं यांची इंग्रजीतील पुस्तकांचे मराठी भाषेत प्रकाशित करण्यासाठी सर्व पुरोगामी युवकांनी प्रयत्न करावे जेणेकरून त्यांचा साहित्यविचार महाराष्ट्रातील तळागाळातील लोकांच्या पर्यंत पोहचेल.
यावेळी प्रा. विजयकुमार जोके , सुधीर दाभाडे, बाबासो कांबळे, सचिन पाटील,पोपट बनसोडे, मारुती रोकडे,गोरक्ष घेवदे, सुभाष कदम उपस्थित होते.
0 Comments