BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा तालुक्यातील 5 मुले मोफत हृदय शस्त्रक्रियेसाठी मुंबईला रवाना


 शिराळा: शिराळा तालुक्यातील ५ हृदय रोग असणारी मुले राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत SRCC हॉस्पिटल मुंबई येथे आयोजित मोफत ह्रदय शस्त्रक्रिया शिबिरासाठी पात्र ठरली असून ती उपचारासाठी मुंबईला रवाना झाली आहेत.
 जिल्हाधिकारी कार्यालय  येथून सोमवारी सायंकाळी बसने रवाना झाले. पालकमंत्री  जयंतरावजी पाटील यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे शुभेच्छा दिल्या.
 शिराळा तालुक्यामध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत एकूण दोन पथके कार्यरत असून सध्या कोरोनामुळे शाळा व अंगणवाडी बंद असल्याने या दोन्ही पथकातील सर्व ४ वैद्यकीय अधिकारी डॉ संदिप साळी,डॉ प्रकाश मोरे, डॉ सुवर्णा पाटील, डॉ प्रियांका चव्हाण ,२ औषध निर्माण अधिकारी अमोल रसाळ, यशश्री जाधव,२ आरोग्य सेविका सौ सुषमा पाटील, कु. लक्ष्मी कांबळे यांची नियुक्ती उपजिल्हा रुग्णालय शिराळा येथे शिराळा कोविड रुग्णालय व कोविड लसीकरण येथे केलेली आहे.

अंगणवाडी व शाळा बंद असूनसुद्धा अवघड व तात्काळ असणाऱ्या शस्त्रक्रिया लवकर  करून कार्यक्रम अंतर्गत पाठपुरावा घेण्यासाठी व संपर्क साधण्यासाठी शिराळा तालुक्यातील आशा स्वयंसेवीका यांची मोलाची मदत होत आहे.

Post a Comment

0 Comments