शिराळा, ता.११: कोणत्या ना कोणत्या निमीत्ताने गरजू लोकांना मदत करणे हा साई चॅरिटेबल ट्रस्टचा मुख्य हेतू असून हीच सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम सातत्याने केले जात आहे. औषध आणि मानसिक आधाराच्या जोरावर रुग्ण आजारावर मात करू शकतो हाच आधार देण्यासाठी समाज्यातील प्रत्येक घटकाने पुढे येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन साई चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष व साई हॉस्पिटलचे अस्थीरोग तज्ज्ञ डॉ.शैलेश माने यांनी केले.
प्रेस क्लब ऑफ शिराळा व शिराळा तालुका मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना रुग्णांसाठी मोफत आहार वाटप उपक्रम सुरू आहे. या उपक्रमाच्या निमित्ताने एक सामाजिक बांधिलकी म्हणून डॉ.शैलेश माने यांच्या वाढदिवसानिमित्त साई चॅरिटेबल ट्रस्ट व साई हॉस्पिटलयांच्यातीने कोविड रुग्णांना आहार वाटप केले.
यावेळी डॉ. अजय पाटील, सुनीता फाळके,अमित मिरजकर, सलीम मेहत्तर, अमर खांडेकर,, सुशीला माने, दिनेश हसबनीस,विठ्ठल नलवडे, विनायक गायकवाड, शिवाजीराव चौगुले, अजित महाजन, प्रीतम निकम, विजय गराडे, मनोज मस्के,विकास शहा,,सचिन पाटील, प्रताप कदम उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------------
शिराळा: शिराळा तालुक्यातील २०,हातकणंगले तालुक्यतील १,अशा एकूण २१ गावात ४३ जणांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.
यावेळी पाटील म्हणाले,अंत्री बुद्रुक,आरळा,बिऊर,जांभळेवाडी,खवरेवाडी,खेड,वारणावती,निगडी,शिराळे खुर्द,टाकवे,विरवाडी, हातकणंगले तालुक्यातील वाठार, प्रत्येकी १,मणदूर,मांगले,रिळे,शिंगटेवाडी,प्रत्येकी २,बिळाशी,सोनवडे,प्रत्येकी ३,कांदे,शिराळा,प्रत्येकी ५,करमाळे ७,असे एकूण ४३ रुग्ण सापडले आहेत.
0 Comments