BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती सांगली यांचेकडून देववाडी व मांगले येथील पन्नास कुटुंबांना मदत

 

देववाडी व मांगले गावातील महापुरामुळे ज्या कुटुंबाच्या घरांची पडझड झालेली आहे अशा देववाडी येथील २० व मांगले येथील ३० कुटुंबांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ‍जनकल्याण समिती सांगली यांच्यावतीने प्रत्येकी ८०२ रूपयांचे  जीवनावश्यक वस्तूंचे कीट वाटप करण्यात आले  या किटमध्ये पाच किलो आटा, पाच किलो तांदूळ, एक किलो तेल, एक किलो मुगडाळ,अर्धा किलो तूरडाळ, अर्धा किलो मीठ, अर्धा किलो कांदा लसूण चटणी ,चहापूड , बटाटा एक किलो, अख्खा मसूर अर्धा किलो, साखर एक किलो, मोठी मेणबत्ती २ नग, काडीपेटी बॉक्स,गोदरेज साबण २ नग,  कपड्याचा साबण २ नग, निरमा पावडर अर्धा किलो या वस्तूंचा समावेश आहे.

       राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे  शिराळा येथील नारायण जोशी, गुरुप्रसाद कुलकर्णी, प्रीतम हसबनीस व चैतन्य जोशी आणि मांगले येथील  वैभव तोडकर, प्रकाश गावडे, सचिन पंडितराव, सचिन चौगुले, संदीप दशवंत व विकास पाटील या संघाच्या कार्यकर्त्यांचा हस्ते सदर कीटचे विष्णू नांगरे यांच्या घरी लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले.

     याप्रसंगी पूरग्रस्त लाभार्थी व   गावकरी उपस्थित होते.गावकऱ्यांच्या वतीने संभाजी खोत  यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले

Post a Comment

0 Comments