शिराळा, ता.१७: शिराळा नगरपंचायत मार्फत आज ४० दिव्यांगांना कोव्हीड लसीकरण करण्यात आले असून त्यांच्या प्रवासाची मोफत सोय करण्यात आली होती.
शहरातील नोंदणी असणाऱ्या १२० दिव्यांग व्यक्तींना संपर्क साधून लसीकरण घेण्याबाबत प्रवृत्त करण्यात आले. नगरपंचायतने त्यांची ने- आण करण्यासाठी मोफत रिक्षाची सोय केली होती. त्यामध्ये आज सुमारे ४० दिव्यांग लोकांनी तर अखेर सुमारे ६० जणांनी लस घेतली आहे. उर्वरित दिव्यांग यांना यापुढे लसीकरण करण्यासाठी त्यांना रांगेत उभे न रहाता त्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र पाहून प्राधान्याने लसीकरण करण्यात येणार आहे. तरी सर्व दिव्यांग बांधवांनी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे व त्यांच्यासाठीही नगरपंचायत कडून मोफत रिक्षा उपलब्ध करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी सांगितले .
0 Comments