शिराळा:सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम केल्यास यश निश्र्चित मिळते,असे प्रतिपादन शिराळा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी प्रदिपकुमार कुडाळकर यांनी केले.ते जिल्हा परिषद शाळा सोनवडे येथे शाळा पाहणी भेटीवेळी बोलत होते.यावेळी ते म्हणाले की,येथील शिक्षकांनी लोकसहभागातून केलेला शाळेचा कायापालट,रंगकाम डिजिटल वर्गखोल्या हे सकारात्मकतेने उत्तम उदाहरण आहे.
यावेळी केंद्रप्रमुख मधुवंती धर्माधिकारी म्हणाल्या की या शाळेने अल्पावधीत केलेली प्रगती ही येथील ग्रामस्थ व शिक्षक यांचा समन्वय असल्याने हे शक्य झाले आहे.यावेळी सर्व शाळेची पाहणी करून साहेबांनी मुख्याध्यापिका विद्या पाटील व शिक्षिका अस्मिता घोलपे,यांचा सत्कार केला.यावेळी केंद्रप्रमुख मधुवंती धर्माधिकारी,सिद्धार्थनगर शाळेचे मुख्याध्यापक मोहन पवार,महादू कोंडार,मुख्याध्यापिका विद्या पाटील अस्मिता घोरपडे,सुवर्णा डवरी,आक्काताई कुंभार,अंजना डवरी,आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments