BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

निराधारांच्या मदतीला धावले प्रहार


   प्रहार संघटना प्रमुख राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यामध्ये पूरस्थिती मुळे जे-जे गावे बाधित झाली आहेत त्या त्या ठिकाणी सर्वतोपरी मदत करण्याचे काम सुरू आहे.

     त्या नुसार  शिराळा तालुक्यातील प्रहारच्या टीमने तालुक्यातील सर्व पूरबाधीत गावांचे सर्वेक्षण केले. त्यानुसार देववाडी गावातील  अनेक कुटुंबांचे नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान होऊन अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. त्यामध्ये एक छाया हिम्मत खोत या महिलेचा समावेश आहे. त्यांच्या पतीच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबातीची जबाबदारी त्यांच्यावर  आहे.  त्यांना एक मुलगा, मुलगी, सासू असा  परिवार आहे.  शेत जमीन नाही. त्या मोलमजुरी करून त्यांच्या संसाराचा गाडा चालवत आहेत. यामध्ये महापुरामुळे त्यांच्या घराची पडझड झालेली ही घटना त्यांनी प्रहार संघटनेचे शिराळा तालुका विभाग प्रमुख ओंकार पाटील यांना सांगितली.

          त्यावेळी त्यांनी प्रहार संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना मदत करण्याचे ठरवले. त्यांच्या घरातील भांडी, धान्य व इतर साहित्य ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. ते संपूर्ण साहित्य ढिगाऱ्याखालून बाहेर काढून त्या ठिकाणी स्वच्छता केली.

       यामध्ये प्रहार संघटनेचे शिराळा तालुका प्रमुख श्रीराम (बंटी) नांगरे पाटील, उपतालुकाप्रमुख दिग्विजय पाटील, विभाग प्रमुख ओंकार पाटील, तसेच रायसिंग पाटील, सुनील पडियार, ऋषिकेश गायकवाड, सचिन मेटकरी हे कार्यकर्ते सहभागी होते.

    यावेळी बोलताना बंटी नांगरे म्हणाले की जे कोण निराधार आहेत. व ज्यांना मदतीची गरज आहे अशा वक्तींनी आमच्या क्रमांकावरती संपर्क साधावा. 7350261194,  8806212983,9960995274

Post a Comment

0 Comments