कृषी दिनानिमित्त शिराळा तालुका कृषिनिविष्ठा विक्रेते संघटनेच्यावतीने राज्यस्तरीय ऑनलाईन चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर स्पर्धेमध्ये भाग घेणेसाठी इच्छुकांनी "किटकनाशके फवारताना घ्यायची काळजी" या विषयावर आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करुन शेतकऱ्यांमध्ये जनजागृती होईल असे चित्र काढून रंगवावे.त्यावर आपले पूर्ण नाव, पत्ता, वय, शिक्षण अशी माहिती व परिपूर्ण चित्र 9860200989 या मोबाईल नंबरवर व्हाट्सपद्वारे पाठवावे.
▶️ही स्पर्धा 4 गटांमध्ये विभागून घेतली जाईल
पहिला गट-इ.पहिली ते चौथी
दुसरा गट-इ.पाचवी ते आठवी
तिसरा गट-इ.नववी ते बारावी
चौथा गट-खुला गट
१)प्रत्येक गटातील पहिल्या तीन विजेत्यांना रोख बक्षिस व प्रशस्तीपत्र देणेत येईल.
२)सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देणेत येईल.
नोंदणी-चित्र पाठवण्याचा कालावधी १ जुलै ते १० जुलै राहील.त्यानंतर येणारे चित्र स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाणार नाही.
निकाल-दि.२० जुलै रोजी आषाढी एकादशीच्या शुभमुहुर्तावर निकाल जाहिर केला जाईल.बक्षिस वितरण सोहळ्याचे स्वतंत्र निमंत्रण देण्यात येईल.
आपले विनित-संयोजक
शिराळा तालुका कृषिनिविष्ठा विक्रेते संघटना
अधिक माहितीसाठी संपर्क-केतन पाटील 9860200989
0 Comments