BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळाचे संजय,अजय आणि विजय जाधव यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

 


शिराळा (प्रतिनिधी) : विकास कामांच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिराळा विधानसभा मतदारसंघात वाढत आहे, असे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.

चिखली (ता.शिराळा) : येथे शिराळा येथील प्रतिष्ठित नागरिक संजय जाधव, भाजपचे प्रमुख कार्यकर्ते, माजी ग्रामपंचायत सदस्य अजय जाधव, विजय जाधव, बॉबी जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले, तालुक्यातील अनेक गावातील विरोधकांचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. अनेकांनी येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जुन्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन नव्या कार्यकत्यांना प्रवेश दिला जात आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विकासात सतत आघाडीवर आहे. कोरोना काळातही मतदार संघात विकास कामांना निधी कमी पडू दिलेला नाही. 

प्रारंभी सुरेश जाधव यांनी सर्वांचे स्वागत केले. शिगळ्यातील प्रतिष्ठित नागरिक संजय जाधव, भाजपचे प्रमुख कार्यकर्ते, माजी ग्रामपंचायत सदस्य अजय जाधव, विजय जाधव, बॉबी जाधव यांचा प्रवेशबद्दल आमदार नाईक यांच्या हस्ते सत्कार झाला. यावेळी भाटवड्याचे (ता. वाळवा) उत्तम जाधव, प्रभाकर जाधव, शशांक जाधव, संदीप जाधव, अभिजीत जाधव, मांगल्याचे डॉ. सतीश पाटील आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments