BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

महागाई कमी करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू-आमदार मानसिंगराव नाईक

 


शिराळा :  सातत्याने वाढती महागाई, पेट्रोल, डिझेल घरगुती वापराच्या गॅसची सतत होणारी दरवाढ या विरोधात केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मार्फत आंदोलन करण्यात आले. 

आंदोलनाचे नेतृत्व आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले. महाजन गॅस एजन्सी पासून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्रितपणे तहसील कार्यालयापर्यंत गेले. तेथे तहसीलदार गणेश शिंदे यांना निवेदन देण्यात आले.  सातत्याने होणारी पेट्रोल, डिझेल घरगुती गॅसची सतत होणारी दरवाढ सर्वसामान्य व शेतकऱ्यांवर अन्याय करणारी आहे. कोरोना महामारीने आगोदरच कंबरडे मोडले आहे. दरवाढ रोखण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. ही दरवाढ रोखून वाढलेले दर कमी करावेत. असे न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी आमदार नाईक, तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे यांनी दिला. यावेळी तालुक्याच्या सभापती वैशाली माने, संचालक सर्वश्री विश्वास कदम, पृथ्वीसिंग नाईक, माजी जि. प. सदस्य प्रवीण शेटे, शिराळा नगराध्यक्ष सुनीता निकम, उपनगराध्यक्ष विजय दळवी, बाजार समिती उपसभापती नंदाताई पाटील, शहर अध्यक्ष सुनील कवठेकर, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राहुल पवार, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष रुपाली भोसले, नगरसेवक सुनंदा सोनटक्के, किर्तीकुमार पाटील, संजय हिरवडेकर, मोहन जिरंगे व सुजाता इंगवले, वक्ता सेलचे तालुकाध्यक्ष, वकील विलास झोळे, विद्यार्थी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष प्रथमेश शिंदे, सागावचे सरपंच तात्यासो पाटील, भागाईवाडीचे सरपंच राम पाटील, वैशाली कदम, वकील महेश शेडगे, राजू निकम, राजसिंग पाटील, उदय पाटील, प्रमोद पवार, प्रतीक पाटील, माजी उपसरपंच अशोक गायकवाड, अनिरुध्द नलवडे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments