शिराळा: भाटशिरगाव ( ता.शिराळा) येथील सव्वीस वर्षीय विधवा महिलेस लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्या प्रकरणी प्रदीप अनिल दंडवते याच्या विरुद्ध शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संशयित प्रदीप दंडवते हा फरारी आहे.
याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की , या पीडित विधवा महिलेस लग्नाचे अमिश दाखवून मे २०२० ते जानेवारी २०२१ या दरम्यान संशयित प्रदीप ने वारंवार बलात्कार केला. अशी फिर्याद पीडित महिलेने पोलीस ठाण्यात दिली आहे. पुढील तपास साह्ययक पोलीस निरीक्षक अभिजीत वाडेकर करीत आहेत.
0 Comments