BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

रब्बी हंगामातील पीक स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण


 शिराळा, ता.१: कृषी संजीवनी मोहीम ,कृषी दिन व कृषी संजीवनी मोहीम समारोप कार्यक्रम अंतर्गत घेण्यात आलेल्या रब्बी हंगाम २०२०पिक स्पर्धेतील तालुकास्तरीय पीक निहाय पीक स्पर्धा विजेत्या शेतकऱ्यांचा शिराळा पंचायत समिती येथे  सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

   गहू  पिकामध्ये प्रथम क्रमांक माणिक सर्जेराव दशवंत- मांगले, द्वितीय क्रमांक  दत्तात्रय ईश्वरा दशवंत- मांगले, तृतीय क्रमांक संभाजी सखाराम नागरे- मांगले.

  ज्वारी पिकामध्ये प्रथम क्रमांक  सर्जेराव रामचंद्र पाटील-कापरी, द्वितीय क्रमांक  शंकर भिवाजी खोत-कुसाईवाडी, तृतीय क्रमांक तानाजी यशवंत जाधव.(चिंचोली)

या विजेत्यांचा  पंचायत समिती शिराळा येथे सभापती सौ वैशाली माने, माजी सभापती सम्राट नाईक, गटविकास अधिकारी डॉ.अनिल बागल, तालुका कृषी अधिकारी जी. एस. पाटील पंचायत समिती कृषी अधिकारी  धनाजी थोरात, आत्मा शेती सल्ला समिती अध्यक्ष राजेंद्र दशवंत, मंडळ कृषी अधिकारी,शिराळा सुभाष घागरे, मंडळ कृषी अधिकारी,कोकरूड  अरविंद शिंदे, आत्मा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक अमोल माळी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक तसेच प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments