शिराळा : तालुक्यातील ज्या कुटूंबातील कुटूंबप्रमुख व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे, त्या कुटुंबाला संजय गांधी योजनेतून पेंशन देण्यात येईल, अशी माहिती संजय गांधी योजना अध्यक्ष संपतराव शिंदे यांनी दिली.
येथील तहसील कार्यालयात संजय गांधी योजनेची बैठक झाली. नायब तहसीलदार अरुणकुमार कोकाटे प्रमुख उपस्थितीत होते.
अध्यक्ष शिंदे म्हणाले, आमदार मानसिंगराव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली संजय गांधी निराधार योजना कार्यरत आहे. योजने मधून आलेले ३८ प्रस्ताव व श्रावण बाळ योजनेतून १७ असे सर्व एकूण ५५ प्रस्ताव मंजूर करणेत आले. ज्या कुटुंबातील जबाबदार व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, त्या कुटूंबालाही पेन्शन मिळावी, असा आग्रह आमदार नाईक यांचा होता. त्यासाठी त्यांनी केलेल्या विशेष प्रयत्नामुळे अशा कुटुंबाना पेन्शन सुरु केली आहे.
प्रारंभी नीलोफर डांगे यांनी स्वागत केले. सदस्य सुनील तांदळे, संभाजी उपलाने, ए. बी. पाटील, निकम मैडम, संदिप पाटील उपस्थित होते.
0 Comments