BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

जिल्ह्यात पूरस्थितीमुळे 7 हजार 671 कुटुंबातील 36 हजाराहून अधिक व्यक्तींचे व १४ हजार आठशे जनावरांचे स्थलांतर



सांगली, दि. 23, (जि. मा. का.) : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पुरपट्यातील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात येत आहे. आत्तापर्यंत 7 हजार 671 कुटुंबातील 36 हजार 987 व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच लहान व मोठी अशा एकूण 14 हजार 800 जनावरांचेही स्थलांतर करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

जिल्ह्यात पूरस्थितीमुळे पूर्णत: बाधित 6, अंशत: बाधित 80 अशी एकूण 86 गावे बाधित आहेत. यामध्ये मिरज तालुक्यात महानगरपालिका क्षेत्रात अंशत: 1 गाव बाधित आहे. मिरज ग्रामीण मध्ये 2 गावे पूर्णत: तर 2 गावे अंशत: अशी ४ गावे बाधित आहेत. अप्पर सांगली (ग्रामीण) मध्ये 15 गावे अंशत: बाधित आहेत. वाळवा तालुक्यात वाळवा येथील 2 गावे पूर्णत:, 27 गावे अंशत: अशी एकूण 29 गावे बाधित आहेत. अपर आष्टा क्षेत्रातील 1 गाव पूर्णत:, 3 गावे अंशत: अशी एकूण 4 गावे बाधित आहेत. शिराळा तालुक्यातील अंशत: 13 गावे बाधित आहेत. तर पलूस तालुक्यातील 1 गाव पूर्णत:, 19 गावे अंशत: अशी एकूण 20 गावे बाधित आहेत.

स्थलांतरीत व्यक्तींमध्ये मिरज तालुक्यातील महानगरपालिका क्षेत्रातील 234 कुटुंबामधील 1 हजार 6 व्यक्ती, मिरज ग्रामीण क्षेत्रातील 307 कुटुंबातील 2 हजार 207 व्यक्ती, अपर सांगली ग्रामीण मधील 1 हजार 424 कुटुंबातील 5 हजार 749 व्यक्तींचे स्थलांतरण करण्यात आले आहे. वाळवा तालुक्यातील वाळवा क्षेत्रातील 2 हजार 452 कुटुंबातील 14 हजार 725 व्यक्तींचे तर अपर आष्टा क्षेत्रातील 424 कुटुंबातील 2 हजार 135 व्यक्तींचे स्थलांतरण करण्यात आले आहे. शिराळा तालुक्यातील 394 कुटुंबातील 1 हजार 842 व्यक्तींचे , पलूस तालुक्यातील 2 हजार 436 कुटुंबातील 9 हजार 323 व्यक्तींचे स्थलांतरण करण्यात आले आहे.

यामध्ये जनावरांचे मिरज तालुक्यातील मिरज ग्रामीण क्षेत्रातील 1 हजार 219, अपर सांगली ग्रामीण क्षेत्रातील 1 हजार 746, वाळवा क्षेत्रातील 3 हजार 262, अपर आष्टा क्षेत्रातील 1 हजार 90, शिराळा तालुक्यातील 2 हजार 228, पलूस तालुक्यातील 5 हजार 255 जनावरांचे स्थलांतरण करण्यात आले आहे. वाळवा तालुक्यातील 5 व पलूस तालुक्यातील 3 अशा एकूण 8 जनावरांची जीवितहानी झाली आहे.

Post a Comment

0 Comments