BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

कोकणेवाडीच्या ४६कुटुंबांचे स्थलांतर

 

कोकणेवाडी (ता.शिराळा ) येथील ४६ कुटुंबांना डोंगर भुसखलनाचा असणारा संभाव्य धोका गृहीत धरून गुढे येथील दोन हायस्कूल मध्ये हलवण्यात आले आहे. त्यांना आमदार   मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते चादर व चटई वाटप करण्यात आले.

कोकणेवाडी येथील डोंगर खचू लागला आहे.त्या डोंगराजवळ ही कोकणेवाडी आहे.सध्या पावसाचा जोर असल्याने व आणखी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.त्यामुळे खबरदरीची उपाययोजना म्हणून लोकांना सुरक्षित ठिकाणी ४६ कुटुंबातील २४६ लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

त्या ठिकाणी त्यांच्या राहण्याची, जेवण,चहा याची सोय करण्यात आली आहे.

यावेळी आमदार मानसिंगराव नाईक, तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी डॉ.अनिल बगल यांनी , सहाय्याक गट विकास अधिकारी आर.एस.माने भेट देऊन त्यांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची पाहणी केली.



Post a Comment

0 Comments