BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा तालुक्यातील नदी काठच्या या गावातील ३९४ कुटुंबांचे स्थलांतर


 शिराळा, ता.२३: शिराळा तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी अतिवृष्टी असून चांदोली परिसरात १४५ मी.मी.पावसाची नोंद झाली आहे.  धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू असल्याने  धरण दुपारी ३.०० वाजलेपासून २८००० क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे . त्यामुळे नदीकाठावरील एकूण १ ९ गांवे अंशतः बाधीत झालेली असून , त्यापैकी सागाव , मांगले व देववाडी ही गांवे जास्त प्रमाणात बाधीत झालेली आहेत . आज दुपारी २ वाजे पर्यंत या सर्व गावामधील एकूण ३ ९ ४ कुंटुबांना स्थलांतरीत करणेत आलेले आहे . त्यापैकी लहान मुले ३६६ व मोठी माणसे १४७६ अशी एकूण १८४२ लोकांना स्थलांतरीत करणेत आलेले आहे. देववाडी येथील कुंटुबांना एस.टी. मधून शिराळा येथील मंगल कार्यालयामध्ये स्थलांतरीत करणेत आलेले आहे.या १ ९ गावामधील एकूण २२२८ जनावरांना स्थलांतरीत करणेत आलेले आहे . शिराळा तालुक्यामधील नदीकाठी असणा - या गावांमधील नागरिकांनी सावधानता बाळगावी व नदीपात्रात कोणीही जाऊ नये .  कोणत्याही अफवावर विश्वास ठेऊ नये असे आवाहन  तहसीलदार गणेश शिंदे यांनी केले आहे .


  वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन चरण-सोंडोली, बिळाशी-भेडसगाव, मांगले-काखे ,शित्तुर-आरळा हे चार महत्वाचे पूल पाण्याखाली गेले आहेत. तर कोकरूड-रेठरे, शिराळे खुर्द-माणगाव, मांगले-सावर्डे हे तीन बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

शिराळा येथील तोरणा ओढ्याला मोठा पूर आल्याने शिराळा येथील तीन पूल पाण्याखाली गेले आहेत. शिराळच्या इतिहासात पहिल्यांदा एवढा मोठा पूर आला असल्याचे जाणकार सांगत आहेत.ओढ्या काठी असणाऱ्या राजेंद्र हिरवडेकर यांच्या जनावरांचे शेड पाण्याखाली गेले आहे.  संदे टायपिंग इन्स्टिट्यूट मध्ये  व कोतवाल गल्ली काही घरात पाणी शिरले.दरम्यान भाडुगळेवाडी-येसलेवाडी दरम्यानच्या रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. 



शिराळा येथे ३२ तास विद्युत पुरवठा खंडित झाल्याने लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले.


वारणा नदीकाठावरील देववादी, मांगले, कांदे आणि सागाव या ठिकाणी जाऊन युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांनी  पूर परिस्थितीची पहाणी केली.

Post a Comment

0 Comments