शिराळा येथे भाजप विद्यार्थी संघर्ष यात्रेचे स्वागत करताना जयसिंगराव शिंदे,प्रतापराव पाटील,नगरसेवक केदार नलवडे,निलेश पाटील,योगेश पाटील,रामभाऊ जाधव
शिराळा, ता.३: भारतीय जनता पक्ष विद्यार्थी आघाडी सांगली जिल्हा यांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या साठी विद्यार्थी संघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
या यात्रेचे शिराळा येथे महाडिक युवा शक्ती संपर्क कार्यालय येथे स्वागत करण्यात आले. यावेळी भाजपा विद्यार्थी जिल्हा उपाध्यक्ष यागेश पाटील यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी जयसिंगराव शिंदे म्हणाले,विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करून कोरोनामुळे न झालेल्या परीक्षेचे शुल्क तात्काळ परत करावे.
प्रतापराव पाटील म्हणाले, क्रीडा क्षेत्रात आपले भवितव्य उज्वल करण्याचे प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान या कोविड काळात झाले आहे. तरी विद्यार्थ्याना त्यांची वयोमर्यादा वाढवून द्यावी तसेच सन २०१७ ते २०२१ साठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांचे सर्व विभागातील शिष्यवृत्ती प्रलंबित आहे त्या सर्व विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्यांच्या खात्यावर त्वरित जमा करावी.
यावेळी नगरसेवक केदार नलवडे, प्रतिक साळुंखे यांची भाषणे झाली यावेळी हारून शेख,सागर पाटील,महेश कोळे,सचिन दिवटे,अभिषेक हसबनीस,प्रतिक हसबनीस,सौरभ नलवडे,अभिनव नलवडे,वैभव इंगवले,भुषण पाटील,अजित कुंभार,बाळकृष्ण घाटगे,बाजीराव नलवडे, अशोक सवाईराम,अमित माने,प्रथमेश शेटे उपस्थित होते. आभार राम जाधव यांनी मानले.
0 Comments