BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

पशुचिकित्सकांच्या मागणीचा पाठपुरावा शासन दरबारी करू-आमदार मानसिंगराव नाईक

 


 शिराळा: पशुचिकित्सा व्यवसायिक संघटना,महाराष्ट्र यांच्यावतीने आपल्या विविध मागण्यांचे निवेदन आमदार मानसिंगराव नाईक यांना देण्यात आले. यावेळी पशुचिकित्सकांच्या मागणीचा पाठपुरावा शासन दरबारी करण्याचे आश्वासन आमदार मानसिंगराव नाईक दिले.

या निवेदनात म्हटले आहे, संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी १५जून पासून लसीकरण व अहवाल बंद आंदोलन पुकारले आहे. संघटनेने सहायक आयुक्त पशुसंवर्धन, पशुधन विकास अधिकारी गट अ सेवा प्रवेश नियमात सुधारणा करावी,पशुधन विकास अधिकारी(विस्तार) गट अ पंचायत समिती या पदनामात बदल करून तालुका पशुसंवर्धन अधिकारी गट अ पंचायत समिती करू नये, पशुधन पर्यवेक्षक, सहायक पशुधन विकास अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या तिसऱ्या कालबद्ध पदोन्नतीच्या वेतन निश्चितीत सुधारणा करावी, ग्रामसेवक,कृषी सहाय्यक यांच्या धर्तीवर संवर्गातील कर्मचाऱ्यांना दरमहा वेतनातून कायम प्रवास भत्ता मंजूर करावा,पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना फ्रंटलाईन वर्कर व कोविड योद्धा घोषित करून विमा सुरक्षा कवच व आवश्यक सेवेतील सुविधा द्याव्यात, पशुसंवर्धन विकास अधिकारी गट ब पदोन्नती बाबत पाठपुरावा करावा,१२ विज्ञान शाखे नंतर तीन वर्षांचा पशुसंवर्धन विषयक पदविका अभ्यासक्रम सुरू करावा, पशुधन पर्यवेक्षक ते सहायक पशुधन विकास अधिकारी पदोन्नती करावी,राज्य शासनाअंतर्गत कार्यरत सहायक पशुधन विकास अधिकारी पदाचा विभाग निहाय असमतोल दूर करावा अशा मागण्या शासनाकडे केल्या आहेत.या मागण्यांबाबत पाठपुरावा करावा.

यावेळी या मागण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन आमदार मानसिंगराव नाईक यांनी संघटनेच्या पदाधिकारी यांना दिले .

यावेळी संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष डॉ.वजीर चौगुले, कोषाध्यक्ष डॉ.व्ही.ए.खंदारे, सचिव डॉ.ए.एस.गायकवाड ,डॉ.टी. वाय. साळुंखे,डॉ.विठ्ठल व्हानमाने,डॉ.विरपाक्ष खंदारे,डॉ.दीपक पाटील,डॉ.मुसा मुल्ला,डॉ.आर.आर.पाटील,डॉ.थोरात,डॉ.कोळी  उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments