BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

पूरग्रस्तांना शासना मार्फत देण्यात येणाऱ्या मोफत धान्य वाटपाचा शुभारंभ

 

कांदे (ता. शिराळा) येथे शासनामार्फत पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मोफत धान्याचे वाटपाच शिराळा तालुक्यातील शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी व आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते कांदे येथे झाला. 

शिराळा तालुक्यात वारणा नदीस पूर येऊन शेती व घरांचे मोठे नुकसान झाले. अनेक नागरिकांना स्थलांतरीत व्हावे लागले. गावांचा संपर्क तुटला होता. रस्ते, पूल, पानंदीचे रस्ते, साकव यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनामार्फत जाहीर झालेल्या धान्याचे वाटप कांदे येथील ४७ पूरग्रस्त कुटुंबाना देण्यात आले. यावेळी तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, जिल्हा परिषद सदस्य संपतराव देशमुख, सूतगिरणीचे अध्यक्ष सुरेश चव्हाण, सरपंच मनिषा कुंभार, उपसरपंच विश्वास पाटील, माजी सरपंच सुवीर चव्हाण, माजी उपसरपंच शशिकांत पाटील, सोसायटी उपाध्यक्ष महादेव चव्हाण, गजानन पाटील, आनंदराव पाटील, संजय पाटील आदी उपस्थित होते. दरम्यान शिंगटेवाडी येथे पुराणे झालेल्या नुकसानीची पाहणी जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी केली. तालुक्यातील ज्या रस्त्यांचे, पिण्याच्या पाणी योजनांचे व वीजेचे नुकसान झाले आहे, त्याचा सर्व्हेक्षण करून त्याच्या दुरुस्तीची कामे तातडीने सुरू करावीत, अशी सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली.

Post a Comment

0 Comments