BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

पर्यटकांना उखळू धबधब्याची वाट झाली सोपी


 प्रणव महजन/शिराळा

पावसाळ्यात आणि हिवाळ्यात भरपूर पाणी असणारा असा उखुळचा धबधबा चांदोली अभयारण्याच्या हद्दीवर आहे. या धबधब्याकडे बरेच पर्यटक छोटी सहल म्हणून येत असतात.गेल्या कित्येक वर्षापासून सर्व पर्यटकांना अवघड रस्त्याने धबधब्याकडे जावे लागत आहे. परंतु याच परिसरात सर्वांना जाता येईल अशी सोपी वाट आहे. 

 या वाटेवर कोणताच दिशादर्शक फलक अथवा मार्किंग नसल्यामुळे, लोकांना नाहक त्रास सोसत अवघड वाटेने जावे लागत आहे. अवघड वाटेवर झाडांचे अच्छादन नसल्यामुळे उन्हाचा त्रास सहन करत जावे लागते. तसेच बरेच पर्यटक अवघड वाटेने जाताना पडल्याचे अथवा जखमी झाल्याचे सुद्धा पहावयास मिळत आहे. याचाच विचार करून प्लॅनेट अर्थ फाउंडेशन आणि बारबेट हाऊस ऑफ चांदोली मार्फत योग्य वाटेवरून झाडांना आणि दगडांवर पांढऱ्या रंगाने मार्किंग करण्यात आली आहे. यामुळे सर्व वयोगटातील नागरिक या वाटेने निसर्गाचा आनंद घेत धबधब्यापर्यंत सुखरूप जाऊ शकतील. या वाटेवरून जाताना नागरिकांना ट्रेकिंग केल्याचा अनुभव मिळेल. तसेच ही वाट संपूर्ण झाडातून गेल्यामुळे लोकांना सावली मिळेल आणि गरज वाटल्यास विश्रांती सुद्धा घेता येईल. पर्यटकांनी धबधब्याकडे जाताना कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नये तसेच पायामध्ये कंपल्सरी बूट असावेत. तसेच परिसर स्वच्छ असल्यामुळे त्याची स्वच्छता अबाधित ठेवण्यास मदत करावी. कोणत्याही प्रकारचा प्लास्टिक किंवा इतर कचरा करु नये.

या वाटेवर पांढऱ्या रंगाचे मार्किंग करत असताना प्लॅनेट अर्थ फाउंडेशन संस्थेचे उपाध्यक्ष प्रणव महाजन, सदस्य वैभव नायकवडी, सफारी गाईड गणेश पाटील इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments