शिराळा, ता.१३: सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी सर्वांनी रुग्ण सेवा हीच ईश्वरसेवा मानून काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे भरारी पथक सदस्य अभिनेते रंगराव घागरे यांनी केले.
प्रेस क्लब ऑफ शिराळा व शिराळा तालुका मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना रुग्णांसाठी मोफत आहार वाटप उपक्रम सुरू आहे. या उपक्रमाच्या निमित्ताने एक सामाजिक बांधिलकी म्हणून खबाले गल्ली येथील श्रीनाथ गणेश गवाणे याच्या वाढदिवसानिमित्त श्रीआलय नागराज मंडळ यांच्यातीने कोविड रुग्णांना आहार वाटप केले.
यावेळी डॉ. गायत्री यमगर, वैशाली पवार, अमर खांडेकर, आकाश पानसे, अतुल देसाई, उमेश जाधव, दिलीप गायकवाड, गणेश गवाणे, श्रीनाथ गवाणे, सचिन पाटील, प्रताप कदम, दिनेश हसबनीस,विठ्ठल नलवडे, विनायक गायकवाड, शिवाजीराव चौगुले, अजित महाजन, प्रीतम निकम, विजय गराडे, मनोज मस्के,विकास शहा उपस्थित होते.
शिराळा: शिराळा तालुक्यातील ११,शाहूवाडी,तालुक्यातील १,अशा एकूण १२ गावात २७ जणांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी दिली.
यावेळी पाटील म्हणाले, बिळाशी, चरण, देववाडी, मांगले, तडवळे,वाकुर्डे बुद्रुक,शाहूवाडी तालुक्यातील सावे,प्रत्येकी १,पणुंब्रे वारुण, २,फुफिरे,रिळे,प्रत्येकी ३,शिराळा ४,सागाव ८,असे एकूण २७ रुग्ण सापडले आहेत.
0 Comments