BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

कोकरूडला श्री' या आधुनिक व्यायाम शाळेचे उदघाटन


कोकरूड : धकाधकीच्या जीवनात युवकांच्यात नियमित व्यायामाची आवड निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी गावोगावी तालमी व व्यायाम शाळा निर्माण होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.

कोकरूड (ता. शिराळा) येथील युवक विनोद घोडे-पाटील यांनी सुरू केलेल्या 'श्री' या आधुनिक व्यायाम शाळेचे उदघाटन प्रसंगी बोलत होते. सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य संपतराव देशमुख प्रमुख उपस्थितीत होते. 

आमदार नाईक म्हणाले, निरोगी जीवनात व्यायामाला अनन्य साधारण महत्व आहे. विज्ञान व तंत्रज्ञानाणे मोठी प्रगती केली आहे. त्यामुळे माणसाची हालचाल कमी झाली आहे. मोबाईल, संगणक एका जागी खिळवून ठेवतो आहे. नियमितपणे व्यायाम महत्वाचा आहे.

प्रारंभी आमदार नाईक यांच्या हस्ते फीत कापून व्यायाम शाळेचे उद्घाटन झाले. मान्यवरांचा सत्कार झाला. यावेळी

राष्ट्रवादीचे सुहास घोडे-पाटील, विकास नांगरे-पाटील, लोकनेते फत्तेसिंगराव नाईक दूध संघाचे संचालक गणेश पाटील, मालेवाडीचे सरपंच लक्ष्मण नांगरे, यशवंत ग्लुकोज संचालक गजानन पाटील, ए. सी. पाटील, अशोक पाटील, बंडा सय्यद, सोसायटी माजी अध्यक्ष सर्जेराव घोडे व आनंदराव घोडे, ग्रामपंचायत सदस्य निवास नांगरे, आनंदराव घोडे-सर, विष्णू दिंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments