चिखली (ता. शिराळा) : येथे विश्वास साखर कामगार संघटनेमार्फत विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्यातील मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना मदतीचे धनादेश वाटप करण्यात आले. कारखाण्याचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते धनादेशाचे प्रदान करण्यात आले. कारखाण्याच्या 'स्टोअर' विभागाकडील कर्मचारी सुखदेव शामराव जगताप (भाटशिरगाव) व अभियांत्रिकी विभागाकडील कर्मचारी विकास शंकर पाटील (पावलेवाडी) यांचे हृदयविकाराने अकाली निधन झाले. त्यांच्या वारसांना प्रत्येकी ७५ हजार रुपयांची मदत संघटनेमार्फत करण्यात आली. यावेळी आमदार नाईक यांनी दोनीही मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची आस्थेवाईकपणे चौकशी केली. मयत विकास पाटील यांचां मुलगा साईराज याचे वडिलांचे लहानपणी छत्र हरवल्याने आमदार नाईक यांनी दुःख व्यक्त केले.
यावेळी कामगार संचालक दत्तात्रय पाटील, संघटनेचे अध्यक्ष टी. एम. साळुंखे, उपाध्यक्ष विजय पाटील, सरचिटणीस विजयराव देशमुख, भाटशिरगावचे उपसरपंच शिवाजी देसाई आदी उपस्थित होते.
0 Comments