शिराळा : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत " आरोग्यासाठी सामाजिक कृती " अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय शिराळा येथे मदत कक्ष स्थापना करण्यात आला . या मदत कक्षाच्या माध्यमातून रुग्णालयात येणाऱ्या लोकांना आरोग्याच्या विविध योजनांची माहिती देणे , योजना मिळण्यासाठीची प्रक्रिया सांगणे , आवश्यक कागदपत्रांची माहिती देणे , कोव्हीड 19 विषयी जनजागृती इत्यादी मदत करण्यात येणार आहे . या आरोग्याच्या योजनांमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजना , पंतप्रधान जन आरोग्य योजना , जननी सुरक्षा योजना , पंतप्रधान मातृवंदना योजना इत्यादी योजनांची माहिती देण्यात येणार आहे . कोरोना लसीकरण जनजागृती ही करण्यात येणार आहे . यावेळी डॉ . जुबेर मोमीन , डॉ . अनिरुद्ध काकडे , डॉ . मयुरी राजमाने , सुनीता फाळके , दीपाली कांबळे , राणी देशमुख , संपदा ग्रामीण महिला संस्थेच्या सी.ए. एच.कार्यक्रमाच्या जिल्हा समन्वक अनुप्रिया कदम , जिल्हा फिल्ड सुपरवायझर सुलभा होवाळे , संगीता भिंगारदिवे उपस्थित होते .
0 Comments