BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

पूरग्रस्तांना अन्न धान्य किट देऊन व गावची स्वच्छता करून त्यांनी केला वाढदिवस साजरा

 


शिराळा:शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामजिक बांधिलकी जपण्याचे संस्कार स्वर्गीय आमदार वसंतराव नाईक व माजी सभापती भगतसिंग नाईक यांच्या कडून मिळाले असल्याचे प्रतिपादन नगरसेवक विश्वप्रताप नाईक यांनी केले.

  माजी सभापती भगतसिंग नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त देववाडी ता. शिराळा येथे पूरग्रस्त बांधवांना अन्न धान्य किट वाटप व पूर आलेल्या ठिकाणची स्वच्छता करतेवेळी ते बोलत होते. सचिव पृथ्वीसिंग नाईक, प्रा. राजसिंह पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना नगरसेवक विश्वप्रताप नाईक म्हणाले, आजोबा वसंतराव नाईक, वडील भगतसिंग नाईक यांनी तालुक्याच्या शिक्षण क्षेत्रात भरीव काम केले आहे. त्यांच्या संस्कारातून आणि विचाराच्या वारस्यातून आमची वाटचाल सुरू आहे. भगतसिंग नाईक यांच्या वाढदिवसाचा खर्च टाळून आम्ही मित्र परिवार यांच्या माध्यमातून अन्नधान्य किट वाटप आणि स्वच्छता मोहीम राबवली आहे. गरजूंना आधार बनून जाणे याची शिकवण मिळाल्यामुळे आमच्या हातून असे कार्य घडत आहे.पूर पट्ट्यातील नागरिकांना आम्ही सामजिक बांधिलकी जपत कर्तव्य पार पाडले आहे.



    स्वच्छता मोहिमेत डॉ.कैलास पाटील, अवधूत गायकवाड, श्रीकांत नलावडे, रणजीत बांदल, अनिकेत कुंभार, सत्यजीत थोरबोले, सुरज गायकवाड, अक्षय घोडे, अभिषेक यादव, बजरंग मोरे, तुषार मुळीक, तय्यब दिवान, ओम मुळे, लाला चौगुले, सागर पाटील यांच्या सह युवक मित्रांनी सहभाग घेतला.

Post a Comment

0 Comments