BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

पालकमंत्री जयंतराव पाटील यांची देववाडीला भेट


 देववाडी (ता. शिराळा) येथे वारणा नदीस आलेल्या पुरामुळे मोठी हाणी झाली आहे. अनेक लोकांना जनावरांसह स्थलांतरील व्हावे लागले आहे. शेकडो एकर शेतीचे क्षेत्राचे नुकसान झाले आहे. त्याची पाहणी आज राज्याचे जलसंपदा मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री मा. ना. जयंतराव पाटील, आमदार मानसिंगराव नाईक व सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांनी केली. झालेल्या नुकसानीबाबत नागरीकांशी चर्चा केली. तहसीलदार गणेश शिंदे यांच्याकडून तालुक्यातील पुर परिस्थितीचा आढावा घेतला. घेण्यात येणार्‍या दक्षतेबाबत चौकशी केली. कांही मार्गदर्शक सूचनाही केल्या. या वेळी गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, सरपंच संजना वरेकर, बाबासो वरेकर, माजी सरपंच सचिन नांगरे, शिवाजी नांगरे, शरद नांगरे, ग्रामपंचायत सदस्य जयवंत शिंदे, डॉ. दिलीप खोत, प्रभाकर खोत, विलास खोत, ग्रामसेवक संदीप कुंभार, तलाठी विनायक पाटील आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments