शिराळा:वारणा नदी पट्ट्यातील गावामध्ये उद्भवलेली पूर परिस्थिती अत्यंत गंभीर आहे, अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत या पूरग्रस्त लोकांना मदत देण्याची गरज असून शासनाने ही बाब गांभीर्याने घेऊन मदत केली पाहिजे तरच त्यांचे संसार पुन्हा उभा राहतील असे मत जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख यांनी व्यक्त केले.
वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द, ठाणापुडे, कुंडलवाडी, कणेगाव, भरत वाडी, तांदुळवाडी,बहादूरवाडी येथे वारणा नदीला आलेल्या महापुरामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा सत्यजित देशमुख यांनी केला. यावेळी ते बोलत होते.
सत्यजित देशमुख पुढे म्हणाले :- वारणा नदीला महापूर आल्याने नदीकाठच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे. 2019 पेक्षा यावर्षी पुरा मोठा फटका बसला आहे. अनेक कुटुंबांचे स्थलांतर झालेले आहे. जनावरांचे स्थलांतर करण्यात आले आहे. अनेकांचे संसार उघड्यावर आलेत, घरांची पडझड झालेले आहे. त्यांना आधार देणे गरजेचे असून ही जबाबदारी शासनाने घ्यावी व तात्काळ मदत देण्याची भूमिका घेतली पाहिजे.
कासेगाव येथे ओढ्याला आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने तेथील घरांचे व संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झालेले आहे. या भागाची देशमुख यांनी केली.
कणेगाव गावचे सरपंच ऍड विश्वासराव पाटील, ऐतवडे खुर्द सरपंच डॉ.ज्योत्स्नाताई पाटील, उपसरपंच संभाजी पाटील, ठाणापुडे चे संदीप पाटील, बहादूरवाडी माजी उपसरपंच भोजराज घोरपडे, राजारामबापू दूध चे व्हा चेअरमन शशिकांत पाटील, कासेगाव ग्रा प सदस्य ज्ञानदेव पाटील, तानाजी पाटील,अभिजित पाटील, आयुब पटेल, हिदा पटेल, सतीश पाटील, प्रविण पाटील,भानुदास मोटे, महेश पाटील, महेंद्र पाटील, आदी उपस्थित होते.
0 Comments