शिराळा, ता.२७: पाडळी (ता.शिराळा) येथील अंगावर गरम पाणी पडून जखमी झालेल्या पूनम महादेव नलवडे(वय ७ वर्षे) या बलिकेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
ही घटना १३ जुलै २०२१ रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.याबाबत सिव्हिल हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ.उबाळे यांनी वर्दी दिली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी ,१३ जुलै रोजी पूनम हिच्या अंगावर गरम पाणी पडल्याने २५ ते ३० टक्के भाजली होती. तिला उपचारासाठी सांगली सिव्हिल येथे दाखल केले होते. उपचार दरम्यान तीच २० जुलै २०२१ रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजता मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस हवलदार कुंभार करत आहेत.
0 Comments